अक्षर आकार:

भागवताची आरती

Bhagavata Arati

भागवताची आरती

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ ॥ वेदाचें हें सार पाहे रसभरित । दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १॥ द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा । तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ जय ॥ २॥ अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती । ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ॥ जय ॥ ३॥ गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें । परीक्षिति-शुकसंवाद आहे ॥ जय ॥ ४॥ भागवतरूपी देवा तूंचि अहेसी । करूं ही आरति एका-जनार्दनासी ॥ जय ॥ ५॥ इति