अक्षर आकार:

देव गजानन एकविंशति अर्पणिका

deva gajAnana

देव गजानन एकविंशति अर्पणिका

सदाशिव शंकर अभ्यंकरविरचित ॐ श्रीगजानन देव गजानन रे । ध्यावा । देव गजानन रे । कार्यारंभी जाणिव पूर्वक, करिती वंदन रे । संकटसमयी आठव होता, संकट निरसन रे । मनास शांती हवी म्हणोनी श्रवणी कीर्तन रे । दुर्गुण नाशुनी, सद्गुणवर्धन सार्थक जीवन रे ॥ १॥ % (AgAshI on Dec 12, 1976)
देव गजानन रे । बघ मन । देव गजानन रे । बघ मन । देव गजानन रे । अफाट जगती, अमाप देती वैभव कानन रे । विपरित करणी, विचलित सरणी झाडुन रक्षण रे । मी माझेचे भीषण क्रंदन सत्वर सांत्वन रे । इष्ट कार्य ते अरिष्ट सारुनी घेती घडवुन रे ॥ २॥ % (lAsalagA.nva on Sept 21, 1991)
देव गजानन रे । सेवी । देव गजानन रे । सेवी । देव गजानन रे । जिथे पाहशी तिथे असे तो भावे प्रकटन रे । निर्मल सुंदर सत्य आवडे सदा विमोहन रे । कर चरणाचे, स्थीर मनाचे मंगल साधन रे । कृती असावी कृती ठसावी लख्ख प्रकाशन रे ॥ ३॥ % (lAsalagA.nva on Sept 21, 1991)
धन्य गजानन रे । स्मर मन । धन्य गजानन रे । स्मर मन । धन्य गजानन रे । संकष्टीला चंद्रदर्शने, सेवुनी अन्ना रे । मंदिरामधे दर्शन नेमे देऊनी दाना रे । भाद्रपदी जन मंगलमेळा डोळां ध्याना रे । जिव्हेवरती शब्द सदोदित नाम गजानन रे ॥ ४॥ % (javAharanagara on Sept 27, 1991)
भज मन । वंद्य गजानन । वंद्य गजानन रे । भज मन । वंद्य गजानन रे । धांव धावुनी धडपड करुनी धड ना साधन रे । धनामागुनी धन धन करिशी अंती निर्धन रे । सगा सोयरा आप्त पसारा माया वर्धन रे । नाम वाग्धना, सखा चिद्घना साध्य जनार्दन रे ॥ ५॥ % (javAharanagara on Sept 28, 1991)
पहावा । देव गजानन रे । देव गजानन रे । पहावा । देव गजानन रे । लोभस लोचन, दृष्टि अलौकिक निर्भय लावुन रे । सत्य शिवाचे सौंदर्यात्मक समूर्त दर्शन रे । अंतर्मुखता साधुनी वेधक अंतरी जाणुन रे । चराचराचे ठायीं सात्विक भरुनी राहुन रे ॥ ६॥ % (vasa_I on August 23, 1991)
गावा । देव गजानन रे । देव गजानन रे । गावा । देव गजानन रे । पहांट समयी सरळ मनाने देऊळी जाऊन रे । भोजन समयी तृप्त मनाने समंत्र घोषुन रे । संध्यासमयी शांत मनाने सुस्वर आर्तुन रे । निद्रेसमयी एक मनाने तन्मय होऊन रे ॥ ७॥ % (vasa_I on August 23, 1991)
जपावा । मंत्र गजानन रे । देव गजानन रे । जपावा । मंत्र गजानन रे । इच्छा असुनी कांही न घडता गलबलता मन रे । इकडे तिकडे धांव धांवता घडपडता मन रे । कंटाळ्याने वेठिस धरिता खळखळता मन रे । तुटपुंजीधन ओढ ग्रस्तता धडधडता मन रे ॥ ८॥ % (javAharanagara Oct 2, 1991)
जपावा । मंत्र गजानन रे । देव गजानन रे । जपावा । मंत्र गजानन रे । पायी चालता, धोका दिसता, अडखळता मन रे । सोय पाहता, अंगा भिडता, नटखटता मन रे । उगाच घेता, विना दानता, खडखडता मन रे । फुका मागता, लोचट होता, खटखटता मन रे ॥ ९॥ % ( javAharanagara Oct 2, 1991)
सहाय्या । देव गजानन रे । देव गजानन रे । सहाय्या । देव गजानन रे । प्रवास घडता, प्रयास पडता, अपघाता पण रे । नाडुनी जाता, कोरड पडता, भागविता मन रे । दैव ठाकता, प्रसंग पडता, निभाविता पण रे । मरण ओढता, चिंता पडता, सोडविता पण रे ॥ १०॥ % ( javAharanagara Oct 3, 1991)
वंदन श्री गणराज । अनुदिन । वंदन श्री गणराज । छुम छुम झुन झुन रिमझिम रुणझुण घागरिया स्वरसाज । सागरपोटी, भरती ओहोटी, लाटांचा नित गाज । सनई चौघडा, भेरी कर्णा, झंचक झंचक झांज । श्वास श्वास जंव, हृदयींचा रव, परमपदाला काज ॥ ११॥ % (nAgapUra on Oct 15, 1991)
स्मर मन । देव गजानन रे । देव गजानन रे । स्मर मन । देव गजानन रे । देह मंदिरी ज्योत तेवते, ती सरसावुन रे । गंध सुमांचा गुलाब राजा कांटे निरसुन रे । सृष्टिरूप हे सुंदर नयनी नामे घडसुन रे । संतजनांची जीवनगंगा करी अवगाहन रे ॥ १२॥ % (nAgapUra on Oct 18, 1991)
भज मन । मंगलमूर्तीला । मंगलमूर्तीला । भज मन । मंगलमूर्तीला । उपचाराने पूजा अर्चन करूनी आरतीला । पंचखाद्य ते नैवेद्याला पोषण पूर्तीला । देवापाशी काय मागशी मानस तृप्तीला । उपासनेला खंड नसावा आशिष सत्कृतिला ॥ १३॥ % (nAgapUra on Oct 18, 1991)
स्मर भज । जय श्री गणराया । जय श्री गणराया । स्मर भज । जय श्री गणराया । चंदनापरी तनमन झिजवी सार्थक करी काया । आदळ आपट क्रोध माजवी वर्तन वैराया । शांत गायनी नाम गाजवी जीवन ताराया । माय, बालका पाजवी जोजवी ठेवित प्रभु ठाया ॥ १४॥ % (nAgapUra on Oct 18, 1991)
ध्यावा । देव गजानन रे । देव गजानन रे । ध्यावा । देव गजानन रे । परंपरागत स्वागत आगत षोडषपूजन रे । नवा जुना हा विषय राहिना पूर्ण सनातन रे । फल श्रद्धेचे ज्याचे त्याला देई कृपाघन रे । भावोन्नयनी प्रसन्न मानस मंगल जीवन रे ॥ १५॥ % (pArle on Oct 25, 1991)
गजानन । देव गजानन रे । देव गजानन रे । गजानन । देव गजानन रे । त्रिवार वंदन, कर अभिवादन, शंकरनंदन रे । दुर्वादलांनी, लाल फुलांनी, सुंदर मोहन रे । आवर्तनयुत, अभिषेकाने, मंत्रोच्चारण रे । पार्वतीनंदन, गिरिजानंदन, गौरीनंदन रे ॥ १६॥ % (pArle on Oct 25, 1991)
गाऊन । देव गजानन रे । देव गजानन रे । गाऊन । देव गजानन रे । ध्वनिलहरींनी भरल्या जगती भक्ती छेडुन रे । दूर जवळ त्या कंप वाहती ॐ स्वीकारून रे । असुरपणाचा सूर लाविती मधुरा पावन रे । अंतःकरणी नामस्वरांनी प्रेमा भारून रे ॥ १७॥ % (pArle on Oct 25, 1991)
आठव । देव गजानन रे । देव गजानन रे । आठव । देव गजानन रे । मानस शांती हवी मिळाया मंत्रा सांठव रे । दुरित विकारा विलया जाया पुण्या गांठव रे । नाना व्यत्यय ध्यास घ्यावया सबुरी पाठव रे । बळकट बलता साधन ठाया यत्ना ठोठव रे ॥ १८॥ % (pArle on Oct 25, 1991)
साक्षी । देव गजानन रे । देव गजानन रे । साक्षी । देव गजानन रे । विचार अपुरा, वृथा पसारा ठेविशी झांकुन रे । स्वतः विरहिता, दुजा न चित्ता स्वार्था साधुन रे । कलह माजवी, लोंका दुखवी दुबळ्या रडवुन रे । अशा तुलाही नाम साक्ष दे कुक्षी घेउन रे ॥ १९॥ % (pArle on Oct 25, 1991)
स्मर मन । देव गजानन रे । देव गजानन रे । स्मर मन । देव गजानन रे । भयभीतीने दुर्बल होऊन कासाविस क्षण रे । गतकालाचा सखेद राहून आठविता क्षण रे । मरण दुज्यांचे असह्य ऐकून संवेदन क्षण रे । जित्या जागत्या बुडत्या जाणुन अखेरचा क्षण रे ॥ २०॥ % (pArle on Oct 25, 1991)
भज मन । देव गजानन रे । देव गजानन रे । भज मन । देव गजानन रे । नव उन्मेषी, प्रज्ञा प्रतिभा स्फूर्ति गजानन रे । कर्म कराया कर्मेंद्रिय ती कर्म गजानन रे । ध्यान धराया, भक्ति कराया, ज्ञान गजानन रे । शरीरशुद्धी, अन्तःशुद्धी, शुद्धि गजानन रे । गुरुचरणी सर्वस्व समर्पण त्याग गजानन रे ॥ २१॥ % (AgAshI on Nov 1, 1991)
देवा गणराया । देवा गणराया । भजा या । देवा गणराया । पळ घटिकांचा वेळ माणसा निमिषभरी द्याया । जोवरी जीवन तोवरी साधन पडते मग काया । शक्ति केवढी दिधली देही कार्यीं वेचाया । नादी लागुन इंद्रिय विषयी जाऊ नको वाया ॥ % (pArle on Oct 25, 1991)
यावे श्रीगणराज । देवा श्रीगणराज । यावे । देवा श्रीगणराज । प्रेमभाव हा उत्कट होऊनी ओढ घेतसे आज । % ()
स्मर मन । देव गजानन रे । देव गजानन रे । स्मर मन । देव गजानन रे ।