अक्षर आकार:

आरती योगेश्वरीची २

AratI yogeshvarIchI 2

आरती योगेश्वरीची २

जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ ध्रु.॥ धन्य अंबापूर महिमा विचित्र । पार्वती अवतार योगिनी क्षेत्र । दंतासुर मर्दोनी केले चरित्र । सिद्धांचे स्थळ तें महापवित्र । जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ १॥ पतितपावन सर्वतीर्थ महाद्वारी । मायामोचन सकळ माया निवारी । साधका सिद्धी वाणेच्या तीरीं । तेथील महिमा वर्णू न शके वैखरी । जय देवी जय देवी जय योगेश्वरी। महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ २॥ सिद्धलिंग स्थळ परम पावन । नृसिंहतीर्थ तेथे नृसिंहवंदन । मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण । संताचे माहेर गोदेवी स्थान । जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ ३॥ महारुद्र जेथे भैरव अवतार । काळभैरव त्याचा महिमा अपार । नागझरी तीर्थ तीर्थांचे सार । मार्जन करिता दोष होती संहार । जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ ४॥ अनंतरूप शक्ती तुज योग्य माते । योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते । व्यापक सकळां देहीं अनंत गुण भरिते । निळकंठ ओवाळू कैवल्य माते । जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जय देवी जय देवी ॥ ५॥