अक्षर आकार:

आरती योगेश्वरीची १

AratI yogeshvarIchI 1

आरती योगेश्वरीची १

जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते । जय योगेश्वरीमाते । कुलस्वामिनी जगदंबे करुणामृतसरिते ॥ ध्रु.॥ धर्माला ये ग्लानी, स्थिति केविलवाणी । असुरे पीडित जनता, त्राता तिज न कुणी । साद घाली तुज अंबे धाव धाव जननी । धावा पडता श्रवणी, घेशी धाव झणी । जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ १॥ असुराते निर्दाळुनि, धर्मा रक्षियले । सज्जनपालन केले, दुर्जन मर्दियले । विश्रांतीस्तव निर्जन स्थाना शोधियले । आंबग्रमानिकटी वास्तव्या केले । जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ २॥ वेदपुराणे थकली गाता तुज जेथे । काय पामरे गावे वद तव महिम्याते । दिगंत कीर्ती तव ही त्रिभुवनि दुमदुमते । भावे भजता भक्ते पावशि झणि त्याते । जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ ३॥ दुःसह भव हा तोडी या भव पाशाते । जनन-मरण हे तेची चुकवी झणि माते । मागत काहि न माते तव पदकमलाते । द्यावा तव पदि आश्रय नत अज्ञाताते । जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ ४॥