अक्षर आकार:

श्रीशाकंभरी आरती ३ मराठी

shrI shAkanbharI AratI 3 (Marathi)

श्रीशाकंभरी आरती ३ मराठी

जय देवी जय देवी जय शाकंभरी । श्रीवनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ ध्रु. ॥ दैत्यें सुरजन गांजित पडला दुष्काळ । देखुनि दानव वधिसी सक्रोधें प्रबळ । शाखा वटुनि पाळिसी विश्वप्रिय सकळ । भक्ता संकटी पावसी जननी तात्काळ ॥ १ ॥ सद्भक्ति देवी तू सुरसर्वेश्वरी । साठी शाखा तुज प्रिय षड्विध सांभारी । तिळवे तंबिट कर्मठ द्वादश कोशिंबीरीं । पापड सांडगे वाढिती हलवा परोपरी ॥ २ ॥ अंबे कर्दळि द्राक्षे नाना फळे जाण । दधि घृत पय शर्करा लोणची नववर्ण । कथिका चाकवत चुक्का मधुपूर्ण । वाढिती पंचामृत आले लिंबू लवण ॥ ३ ॥ बर्बूरे कडी वडे वडिया वरान्न । सुगंध केशरी अन्न विचित्र चित्रान्न । भक्ष्यभोज्य प्रियकर नाना पक्वान्न । सुरार रायति वाढिती षड्रस परमान्न ॥ ४ ॥ पोळी सुगरे भरीत आणि वांगीभात । पात्रीं वाढिती सर्वही अपूप नवनीत । जीवन घेता भोजनी प्रसन्न भक्तातें । प्रार्थुनि तांबूल देऊनि वंदी गुरुभक्त ॥ ५ ॥